Condolence Message in Marathi on Death of Father
Shradhanjali Messages in Marathi
एखादी आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा अचानकपणे आपल्याला कायमचे सोडून देवाघरी जातात तेव्हा ते आपल्याला डोळ्यांनी कधीच दिसत नाहीत फक्त आपल्या सोबत उरतात त्यांच्या आठवणी. त्यांच्या आठवणी नेहमी आपल्या मनात राहतात.
मग विचार येते कि आपण त्या व्यक्तीसाठी काहीच करू शकलो नाही, त्या व्यक्तीला वेळ देऊ शकलो नाही. अशावेळी आपण एक मात्र करू शकतो, ते म्हणजे त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठीची प्रार्थना. अगदी लहान शब्द आहे प्रार्थना, पण या प्रार्थनेमधून कुणाच्या आत्म्याला शांती लाभते, हे मात्र तेवढेच खरे आहे. मृत्यूनंतर आत्म्याच्या शांतीसाठी केलेली हि प्रार्थना म्हणजे श्रद्धांजली.
मित्रांनो, आज आम्ही खास याच विषयांवर आपणाकरिता विशेष प्रकारचे श्रद्धांजली वाहणारे संदेश तयार केले आहे. जर आपणास श्रद्धांजली वाहायची असेल तर तुम्ही या लेखात नमूद केलेल्या भावना प्रधान संदेशांचा वापर करू शकता. आजच्या लेखात आपण श्रद्धांजली वाहणारे संदेश Quotes पाहणार आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश – Shradhanjali Messages in Marathi
"भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !"
"आपले लाडके …… यांना देव आज्ञा झाली आणि ते देवाघरी निघून गेले. त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली"
Marathi Shradhanjali Message
"तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो. मनापासून शोक व्यक्त!"
"जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल, पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच तोड नाही, त्यांच्या आठवणींचे झरे इतके की साखरही गोड नाही. भावपूर्ण श्रद्धांजली"
Bhavpurna Shradhanjali
"तो हसरा चेहरा , नाही कोणाला दुःखवले,मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना."
"त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !"
Shradhanjali Message in Marathi
"कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला, आठवण येते प्रत्येक क्षणाला, आजही तुमची वाट पाहतो, यावे पुन्हा जन्माला.भावपूर्ण श्रद्धांजली!"
"तुमचं असणं सर्व काही होतं, आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं.. आज सर्व काही असल्याची जाणीव आहे, पण तुमचं नसणं, हीच मोठी उणीव आहे.. भावपूर्ण श्रद्धांजली"
भावपूर्ण श्रद्धांजली मराठी मॅसेज – Bhavpurna Shradhanjali in Marathi
मित्रांनो, आपल्या आप्तजनिकांच्या अंतिम समयी त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी याकरिता सर्वजण त्यांना श्रद्धांजली अर्पित करीत असतो. परंतु, आपणास माहिती आहे का की ही श्रद्धांजली वाहण्याची परंपरा फार जुनी आहे. आपली संस्कृतीच अशी आहे की, कुठल्याही व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांच्या चांगल्या गुणाचे कौतुक त्यांच्या अंतिम प्रसंगी श्रद्धांजली च्या माध्यमातून व्यक्त केलं जाते. आपल्या प्रियजनांना श्रद्धांजली देण्यासाठी काही Shok Sandesh आणि Quotes खाली दिलेले आहे.
"आपल्या वडिलांना देवाज्ञा झाली ऐकून दुःख झाले, तो एक देवमाणुस होता. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!"
"ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृती आठवणींना दाटून आली.. भाव सुमनांची ओंजळ भरुनी, वाहतो आम्ही श्रद्धांजली..!"
Shradhanjali Quotes in Marathi
"आई बाबांचा लाडका तु, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,परत येरे माझ्या सोन्या, तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा.भावपूर्ण श्रद्धांजली!"
"जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते."
Marathi Death Shradhanjali SMS
"सगळे म्हणतात कि, एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतहि नाही, पण हे कोणालाच कसे समजत नाही,की लाख मित्र असले तरी,त्या एकाची कमी पूर्ण होत नाही."
"भावपूर्ण श्रद्धांजली! देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो"
Vinamra Shradhanjali in Marathi
"आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.
भावपूर्ण श्रद्धांजली!"
"आज त्यांचा मोलाचा सहवास हरवला, त्यांच्या अश्या अचानक जाण्याने आम्ही सारे पोरके झाले आहोत, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली"
Condolence Message in Marathi
"जड अंतःकरणाने, मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो."
Bhavpurna Shradhanjali in Marathi
"क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण, हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण.. भावपूर्ण श्रद्धांजली"
Bhavpurna Shradhanjali Marathi Message
"सहवास जरी सुटला तरी स्मृति सुगंध देत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल. भावपूर्ण श्रद्धांजली"
Rip Quotes in Marathi
"आज ….. आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली"
Dukhad Nidhan SMS in Marathi
"काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुझे अचानक जाणे.. आजही घुमतो स्वर तुझा कानी, वाहतांना श्रध्दांजली डोळ्यात येते पाणी… भावपूर्ण श्रद्धांजली"
Shok Sandesh in Marathi
"ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य आपल्या परिवारास मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली."
मित्रांनो, आपल्या कॅलेंडरवर जे महिने दिलेले आहेत त्या महिन्याच्या काही दिवसांपैकी काही तारखा ह्या विशेष स्वरूपाच्या आहेत. अश्या तारखांना आपण पुण्यतिथी म्हणून संबोधतो. या दिवशी आपल्या देशांतील महान स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक व राजकीय नेत्यांचे निधन झालं आहे. जस की, आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी ही जानेवारी महिन्याच्या ३० तारखेला असते. आपण या दिवसाला राष्ट्रीय शोक दिवस म्हणून व्यक्त करतो. या दिवशी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली जाते.
अशा प्रकारे आपल्या मित्रमैत्रिण, नातेवाईक, थोर महात्मे आणि आपल्या देशासाठी वीरगतीला प्राप्त होणारे जवान यांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि आपले दुःख शब्दात व्यक्त करण्यासाठी आज आपण पहिले शोक संदेश, श्रद्धांजली Quotes. अशेच वेगवेळगे quotes वाचण्यासाठी majhimarathi.com ला अवश्य भेट द्या.
Condolence Message in Marathi on Death of Father
Source: https://www.majhimarathi.com/shradhanjali-messages-in-marathi/
0 Response to "Condolence Message in Marathi on Death of Father"
Post a Comment